*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धुंद पावसात*
नील रंग अंबरात
काळे घन दाटून आले
सर सर धारा आल्या
क्षणांत पाणीच पाणी झाले
कडकडली सौदामिनी
सप्तरंगी कमानी खाली
इंद्रधनुष्य रंग रंगले नि
वसुंधरा न्हाऊन आली —
स्वच्छंदी पावसात
बरसल्या जलधारा
रोमांच उठे अंगावरी
थंडगार खट्याळ वारा
हिरव्यागार रानात
प्रेमीयुगुल ते दंगले
संगे प्रीत गीत गातं
बाहुपाशी विसावले
शुभ्र धवल चांदण्यात
रातराणी बहरली
धुंद गंध सुगंधाने
सुवासाने दरवळली
ओल्या मातीचा सुगंध
हाय हवासा वाटला
सख्या आज तुजसाठी
जीव नकळत आसावला
*शीला पाटील. चांदवड.*

