You are currently viewing अंतरंग

अंतरंग

*ज्येष्ठ साहित्यिका उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, लेखिका, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ती अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अंतरंग*

 

खडक असतो वरुन

किती ओबड धोबड

पण त्याच्या हातून वाहतात

पाण्याचे झरे

 

 

नारळही असतो

वरुन कडक टणक

पण आत असतं

गोड गोड पाणी

 

 

गुलाबाच्या झाडाला

सर्वत्र काटे

पण त्यातूनच उमलतात

सुंदर फुले

 

 

एखादा असतो माणूस

वरुन साधा सुधा

पण त्याच्या आत असतो

प्रेमाचा सागर

 

 

म्हणून कधीही बघू नये

बाह्यरंग !

महत्वाचा असतो

अंतरंग !

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा