*’विश्वकरुणा हा आधुनिक साहित्याचा गाभा!’ – भारत सासणे*
पिंपरी
‘विश्वकरुणा हा आधुनिक साहित्याचा गाभा असून ‘चिंबोरेयुद्ध’ या कादंबरीत हा भाव प्रतीत होतो!’ असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी रविवार, दिनांक ०१ जून २०२५ रोजी पिंपळे सौदागर येथे व्यक्त केले. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे लिखित ‘चिंबोरेयुद्ध’ या कादंबरीला स्मृतिशेष चमेली भाऊराव स्मृती कादंबरी पुरस्काराने सन्मानित करताना सासणे बोलत होते. ज्येष्ठ अनुवादक प्रा. डॉ. विलास साळुंखे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, पीतांबर लोहार, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, स्वाती लबडे, चमेली भाऊराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत हिंगोणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत सासणे पुढे म्हणाले की, ‘मराठीतील कादंबरीलेखन हे रंजनात्मक, कलात्मक, वास्तववादी, अतिवास्तववादी अशा टप्प्यातून जात असताना जागतिकीकरणामुळे त्यांत प्रतीकात्मकतेचा अवलंब करण्यात येत आहे. लबडे यांच्या कादंबरीलेखनातील प्रायोगिकता वैश्विक पातळीवरची असल्याने त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल!’ प्रा. डॉ. विलास साळुंखे यांनी इंग्रजी ही जागतिक स्तरावरील भाषा असल्याने बाळासाहेब लबडे यांचे सर्व लेखन अनुवादित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. सोपान खुडे यांनी, ‘अभिजात भाषा ही अभिजनांपुरती असून लोकसाहित्य अजूनही उपेक्षित आहे!’ अशी खंत व्यक्त केली. पीतांबर लोहार यांनी बाळासाहेब लबडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले.
शशिकांत हिंगोणेकर यांनी प्रास्ताविकातून आईवडिलांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचा शोध घेऊन त्यांचा मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते यथोचित गौरव करण्याचा उपक्रम गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती दिली. पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
———————————
*संवाद मीडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
दहावी बारावी नंतर काय करायचे!!…
घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
आजच प्रवेश निश्चित करा.
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567
कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
