You are currently viewing परशुरामाच्या भूमीतील आधुनिक कर्ण अर्थात जिजाऊचे संस्थापक श्री निलेशजी सांबरे”…

परशुरामाच्या भूमीतील आधुनिक कर्ण अर्थात जिजाऊचे संस्थापक श्री निलेशजी सांबरे”…

“परशुरामाच्या भूमीतील आधुनिक कर्ण अर्थात जिजाऊचे संस्थापक श्री निलेशजी सांबरे”…

अॅड. नकुल पार्सेकर, सदस्य जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, झाडपोली.

पूर्वीच्या काळात दानशूर व्यक्ती़ची वानवा नव्हती. स्वांतत्र्यनंतर या देशात आणि विशेषतः महाराष्ट्राची सर्वव्यापी जी जडणघडण झाली ती त्या काळातील समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांमुळेच. भले ही मंडळी आताच्या आधुनिक जमान्यात विस्मरणात गेली असेल पण सामाजिक कामाचा त्यांनी घातलेला पाया हा विसरून चालणार नाही. महाभारतातील कर्णाचा दानशूर पणा सर्वश्रुत आहे हा इतिहास आहे. कधी कधी या इतिहासाला काल्पनिक मुलालाही दिला जातो. मात्र आपल्या कोकण भूमीत असा एक कर्ण आहे की गेल्या सुमारे पंचवीस तीस वर्षात कोकणातील त्यांचे दातृत्व व कर्तृत्व शब्दबद्ध करणे माझ्यासाठी फारच कठीण आहे.
शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, आरोग्य अशा विविध क्षेत्रात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या चारही जिल्ह्यातील तरुणांना शासकीय सेवेत संधी मिळाली पाहिजे. ते अधिकारी झाले पाहिजेत म्हणून शंभरहून जास्त सुरू केलेली मोफत वाचनालये असतील, पन्नासहून जास्त स्पर्धा परिक्षा केंद्र, अंध- मतिमंद मुलांची शाळा, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र, आपली बहिण सौ. मोनिकाताई पालवे- सांबरे यांच्या माध्यमातून सुमारे पन्नास हजार महिलांना प्रशिक्षण देऊन बचत गटांची राबवलेली यशस्वी मोहीम असेल असे अनेक उपक्रम जिजाऊ या संस्थे मार्फत सातत्याने सुरु आहेत.
आज रत्नागिरी जिल्ह्यात आमचे मिञ सांबरे यांनी एका ऐतिहासिक उपक्रमाची सुरवात केली. रत्नागिरी जिल्ह्यात आपले पिताश्री श्री भगवान सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंभर खाटा़ंच्या सर्व सोयीनी परिपूर्ण आणि सर्व आवश्यक शस्त्रक्रिया करणारे तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून पूर्णपणे मोफत भगवान सांबरे रूग्णालय सुरू केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री श्री उदय सामंत, आमच्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे, गृहराज्यमंत्री श्री योगेशजी कदम, राजापूरचे आमदार श्री भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो रत्नागिरी करांच्या साक्षीने हे मोफत (cash less) रुग्णालय एका विशेष सोहळ्याने सुरु झाले. खरे तर श्री सांबरे व सौ. मोनिकाताई कडून मला आग्रहाचे निमंत्रण होते पण मी माझ्या परिक्षेत व्यस्त असल्याने जावू शकलो नाही.
श्री सांबरे यांनी कोकणात सुरू केलेले अद्ययावत शंभर खाटांचे तिसरे रुग्णालय आहे. पहिले रुग्णालय झाडपोली येथे दुसरे मोफत रुग्णालय शहापूर आणि तिसरे आता रत्नागिरीत. चार वर्षापूर्वी मी माझे सहकारी मिञ मोहन होडावडेकर व पञकार मिञ श्री मंगेश तावडे तिघेही त्यांच्या झाडपोली येथील सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक प्रकल्पाना भेट द्यायला गेलो होतो. तेव्हा मोनिकाताईनी या सर्व सेवाभावी आणि मोफत प्रकल्पा़ची माहिती दिली होती. राजकीय सत्तेवर असणाऱ्यांना जे शक्य नाही ते एक सामाजिक भान असलेला कार्यकर्ता असे प्रभावी, निस्वार्थी काम करू शकतो.. हा एक अपवाद आहे.
सावंतवाडी माठेवाडा येथे सुरू असलेले जिजाऊ मोफत वाचनालय हे सांबरे साहेबांच्या कृपेनेच कार्यरत आहे याच माध्यमातून सात वर्षापूर्वी मी त्यांच्याशी जोडला गेलो. कोरोना सुरू व्हायच्या अगोदर त्यांच्याच मदतीने डॉ. राजेश नवांगुळ यांच्या यशराज मध्ये मेघा आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते. ज्याचा लाभ अनेक रुग्णानी घेतला होता.
हे सर्व नियोजनबद्ध काम करण्यासाठी त्यांनी शेकडो सामाजिक भान व जाण असलेले कार्यकर्ते नेमले असून हे कार्यकर्ते समाजाच्या शेवटच्या घटकांशी संपर्क साधून त्याना मदत करतात. जोडलेली माणसं टिकवण्यासाठी ते आणि त्यांच्या भगिनी सतत आग्रही असतात. माझ्या छोट्या मुलीच्या विवाह प्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्याचे निमंत्रण त्याना मी मोबाईलवर पाठवले. त्याच दिवशी त्यांचा दिल्ली दौरा होता. माञ त्यांनी आपले पिताश्री भगवान सांबरे यांच्या सोबत एका कार्यकर्त्याला देऊन या सोहळ्यासाठी पाठवल. मैत्री जपायची असेल तर सुसंवाद व संपर्क पाहिजे. गेल्या सहा वर्षात असा एकही माझा वाढदिवस गेला नाही की सांबरे साहेबांचा शुभेच्छापर फोन आला नाही.
सांबरे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सजग सामाजिक कार्यकर्ता आणि आपला मित्र म्हणून कळकळीची विनंती करतो आता चौथै मोफत रुग्णालय आपण सिंधुदुर्गात करा. अशा रुग्णालयाची नितांत गरज आहे. गेली पंचवीस वर्षे गोरगरीब रुग्णाना सेवा मिळाली पाहिजे म्हणून या जिल्ह्यातील माझ्या सारख्या अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था प्रयत्नशील होत्या आणि आजही आहेत. सावंतवाडी त मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची गाजरे खाऊन आता अपचन व्हायला लागले. तेव्हा आपणास नम्र विनंती आहे की चौथे मोफत रुग्णालय आपण सिंधुदुर्गात उभारा. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा