You are currently viewing यशवंतगड येथे माहिती फालकाचे अनावरण

यशवंतगड येथे माहिती फालकाचे अनावरण

*यशवंतगड येथे माहिती फालकाचे अनावरण *

*दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांची संयुक्त मोहीम*

रेडी येथील यशवंतगड येथे आज रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांच्या संयुक्त विद्यमानाने यशवंतगडाच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.
यशवंतगडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना गडाचा नकाशा, माहिती व इतिहास समजण्यास मदत व्हावी या उद्देशाने सदर फलक लावण्यात आला आहे. या फालकावर क्यूआर कोड सुद्धा देण्यात आलेला आहे जेणेकरून नवनवीन अपडेट माहिती सर्वांना देता येईल. सदर फलकासाठी अंबिका फॅब्रिकेशन कोलगाव चे मालक रमेश केनवडेकर यांनी सहकार्य केले.
या मोहिमेला यशवंतगड शिवाप्रेमीचे भूषण मांजरेकर, पप्पू तेंडोलकर, सक्षम वाडकर, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे हेमलता जाधव, शितल तावडे, डॉ गणेश आनंदे, सुहास सावंत, विशाल परब, रोहन राऊळ, समिल नाईक, गणेश नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा