You are currently viewing वेंगुर्ले आगार येथे एसटी महामंडळाचा ७७ व्या वर्धापनदिन उत्साहात साजरा

वेंगुर्ले आगार येथे एसटी महामंडळाचा ७७ व्या वर्धापनदिन उत्साहात साजरा

वेंगुर्ले :

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महामंडळाच्या एस.टी. बसेसना वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी महामंडळाचे कर्मचारी व प्रवासी जनतेच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करत सर्वांना मिठाईचे वाटप करीत उत्साहात साजरा केला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत प्रवासी महासंघातर्फे वेंगुर्ले आगारातील उत्कृष्ठ प्रवासी सेवेसाठी तत्परतेने काम करणारे महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र देवून खास गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एस.टी बसेसना पुष्पहार घालण्यात आले. बसस्थानकाची सजावट करण्यात आली तसेच बसस्थानकांत भली मोठी रांगोळी प्रवाश्यांसाठी लक्षवेधी ठरली. यावेळी उपस्थित मान्यवरात वेंगुर्ले आगारचे व्यवस्थापक राहुल कुंभार, स्थानक प्रमुख विशाल देसाई, ग्राहक प्रवासी महासंघाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर, लेखाकार रोगेश्री वाडकर, सहाय्यक वाहतुक नियंत्रक जयंद्रध सासोलकर, वाहातुक नियंत्रक सुनिल धामोळे, प्रमोद परूळेकर, प्रमुख कारागीर प्रशांत आईर यांच्यसह बसस्थानकावर प्रवासासाठी आलेले सर्व प्रवासी या राज्या परीवहन महामंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा