सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी सी. एस. डी. कॅन्टीन सुविधा पूर्ववत सुरु करावी!
पालकमंत्री नितेश राणे यांना इंडियन एक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेस लीगची निवेदनाद्वारे मागणी.
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्हयात सावंतवाडी येथे टी. ए. बटालियन, कोल्हापूर यांची सी. एस. डी. कॅन्टीन सुरु होती. परंतू काही कारणास्तव १४ फेब्रुवारी २०१९ रोजी टी. ए. बटालियन, कोल्हापूर यांचे युनिट मुव्ह झाल्यामुळे सावंतवाडी येथे सुरु असलेली कॅन्टीन कोल्हापूर येथे हलविण्यात आली. त्यामुळे गेली सात ते आठ वर्षे कॅन्टीन सुविधा नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळ जवळ पाच ते सहा हजार कॅन्टीन कार्डधारक माजी सैनिक कॅन्टीन सुविधेपासून वंचित आहेत. सदर माजी सैनिकांना कॅन्टनसाठी बेळगांव, कोल्हापूर, कर्नाटक, गोवा तसेच इतर राज्यात जावे लागते. कॅन्टीन सुविधा पूर्ववत सुरु करण्याबाबत जी. ओ. सी. सब एरीया, पुणे त्याचप्रमाणे ट. ए. बटालियन कॅन्टीन, कोल्हापूर यांच्याशी आमच्या संघटनेद्वारे वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत कॅन्टीन सुविधा देण्यात आलेली नाही. तरी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदर कँटीन सुरू करावी, अशी मागणी पालकमंत्री महोदयांकडे इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग, सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने बाबुराव कविकर, शशिकांत गावडे, सुभाष सावंत, दीनानाथ सावंत, दीपक राऊळ, कृष्णा परब, भिवा गावडे, सुनील राऊळ, प्रकाश सावंत, अनंत सावंत, विश्वजीत सावंत, सगुण पास्ते, मोहन राऊळ, आप्पा राऊळ, संतोष सावंत, सहदेव राऊळ, दीपक राऊळ, सुधाकर नाईक, प्रल्हाद तावडे यांसह संघटनेचे तमाम पदाधिकारी यांनी केली आहे.
सदर निवेदनाद्वारे संघटनेची मागणी अशी आहे की,
१) ओरोस या ठिकाणी कॅन्टीनसाठी २००० स्वेअर फिट पर्यंत जागेची आवश्यकता आहे. तरी ती जागा उपलब्ध करुन देणे.
२) सी. एस. डी. कॅन्टीन जिल्ह्यात मंजुरीसाठी आदरणीय खासदार मा. नारायणराव राणे साहेबांमार्फत सरंक्षण मंत्रायलयाकडून मंजूर करुन देणे.
३) कॅन्टीनसाठी आर्मी दलाकडून रु. २ कोटीची गुंतवणूक करण्याची अट सांगितली जाते ती शिथिल करुन शासनाच्या फंडातून रक्कम उभी करुन सुविधा देण्यास सहकार्य तरी माजी सैनिकांसाठी सिधुदुर्ग जिल्ह्यात लवकरात लवकर सी. एस. डी. कॅन्टीन सुविधा सुरु करण्यासाठी आपण सहकार्य करावे.
अशी सविनय विनंती इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट सेंटर सिंधुदुर्ग संघटनेने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
