You are currently viewing सिंधुदुर्ग विमानतळावरून ११ जून पासून मिळणार हैद्राबाद आणि बंगलोर विमान सेवा..

सिंधुदुर्ग विमानतळावरून ११ जून पासून मिळणार हैद्राबाद आणि बंगलोर विमान सेवा..

सिंधुदुर्ग विमानतळावरून ११ जून पासून मिळणार हैद्राबाद आणि बंगलोर विमान सेवा..

सिंधुदुर्ग

“फ्लाय 91” कंपनीची सिंधुदुर्ग हैद्राबाद आणि बंगलोर विमान फेरी सेवा ११ जून पासून सुरू होणार आहे. कंपनी तर्फे विमानसेवे ची प्रवाशांना बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच या दोन सेवा सुरू होतील त्यामुळे प्रवाशांना त्यांचा फायदा होणार आले. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर सध्या या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे विमान फेरी आठवड्यातून पाच दिवस सुरू आहे. त्यातच कंपनी तर्फे हैद्राबाद आणि बंगलोर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या दोन विमान फेरी चा लाभ घेता येणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा सिग्नल व्यवस्था आता व्यवस्थित सक्षम करण्यात आली आहे, त्यामुळे आता वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत नाही. लवकरच सिंधुदुर्ग मुंबई ही विमान सेवा सुरू झाली तर प्रवाशी वर्गाला मोठा फायदा होऊ शकतो. फ्लाय 91 च्या अधिकृत संकेतस्थळ वर हैद्राबाद आणि बंगलोर सेवा बुकिंग सुरू झाले आहे. याचे तिकीट 2491/-एवढे असणार आहे आठवड्यातून चार दिवस या सेवा असतिल असे कंपनी कडून जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा