*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम ललित लेख*
*चित्र ललित*
अगं अगं…ऐकतेस का…आजच्या प्रगतीशील काळातील युवती आहेस तू…
शिकलेली,सवरलेली..माहितीजालामुळे अनेक गोष्टींचे तुला ज्ञान आहे…मग तू निडर ,बेडर कां गं दिसत नाहीस…?
की सगळं असणंच कधी तारक ऐवजी मारक ठरतं आहे.मोहजालातमन गुंतत जातं आहे.म्हणून अशी डोळ्यात भीतीचं सावट वावरतंय तुझ्या.
पुढं जायचं तर बाई गं…हिंमत हरू नकोस..सांभाळ स्वतः ला आणि जा बेधडक पुढे…तिने आपले अवगुंठीत रुप एकदा आरशात न्याहाळले.अनेक अवघडलेले प्रसंग तिच्या नजरेसमोरून तरळले,ऑफीसमधील उच्चभ्रू बाॅस,बसमधील , ट्रेनमधील हेतुपुरस्सर दिलेले धक्के, तिच्या कडे बघत तसल्या कमेंट्स..खूप काही सहन करत होती ती…
त्यासाठीच हा चेहराही देखणा असून तिला नकोसा व्हायला लागला होता..
पण आज आरशासमोर तिने स्वतः च स्वतः शी संवाद साधला आणि
तिने सर्व जगाला धीराने तोंड द्यायचे ठरवलं…आता हा चेहरा तिला बंधनातून सोडवायचा निर्धार तिने केला होता.
.यश तिच्या वाटेकडे आता डोळे लावून बसलं आहे..ती निर्भिड झालीय..!
अरुणा दुद्दलवार @✍️

