*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*छंद आवडीने*
कविता कशी करावी लिहावी
हे कोणी कोणास शिकवू नये
चार ओळी लिहिता बोलता आल्या
हे ही काही कमी नव्हे
अभंग ओव्या ज्ञाना नामा तुकयाचे
वारकरींचे मुखोद्गत आहे
चालता बोलता उठता बसता
गात गात जीवन जगत आहे
निरक्षर म्हणता बहिणाबाई
कविता अजरामर झाल्या
साता समुद्रापार विदेशात
अभ्यास मराठी शिकवू लागल्या
लिहीतो जरी तोटके थोडे काही
विचार सुविचार मांडतो आहे
प्रयत्नांती परमेश्वर छंद आवडीने
हळूहळू कविता लिहितो आहे
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७६.

