बांदा दोडामार्ग आयी राज्यमार्ग १८६ हा रस्ता दुपरीकरण करण्याबाबत तसेच सुपारी संशोधन केंद्र भारत सरकारचे कार्यालय दोडामार्ग तालुक्यात होणेबाबत.
माजी खासदार नारायण राणे यांना शिवसेना दोडामार्ग तर्फे निवेदन सादर
दोडामार्ग
नवनिर्मित दोडामार्ग तालुक्यामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ हा जात होता. परंतु काही वर्षपूर्वी हा महामार्ग बांदा पत्रादेवी मार्गे पणजी असा करण्यात आला. त्यामुळे दोडामार्ग तालुका रस्त्याचा दर्जा कमी झाल्यामुळे वाहतुकीच्या साधन सुविधेपासून तालुका वंचित राहतो. त्याचप्रमाणे याच रस्त्यावर आडाळी येथे महाराष्ट्र शासनाने एमआयडीसी मंजूर केलेली आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्याशी दळणवळणाचे साधन, मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे हा मार्ग उपयोगी पडणार आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील सर्व ग्रामस्थाची अशी मागणी आहे कि, सदर रस्ता बांदा दोडामार्ग आयी राज्यमार्ग १८६ हा रस्ता दुपरीकरण करण्यात यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्गचे मा.नारायणराव राणे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दोडामार्ग तालुक्यामध्ये सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सुपारी बागायत क्षेत्रामध्ये नवनविन प्रयोग, नविन लागवड करण्यासाठी तरुण शेतकरी उत्सुक आहेत. त्यांना मार्गदर्शन होण्यासाठी तसेच भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनाचा लाभ मिळण्यासाठी असे संशोधन केंद्र आवश्यक आहे. त्याची कार्यालये कर्नाटक, केरळ राज्यात आहेत. महाराष्ट्र राज्यात ते रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.
परंतु आपल्या शेतक-यांना अत्यंत दूर असल्याने आपण व्यक्तीशः लक्ष घालून केंद्रीय कृषि कार्यालय सलग्न असलेल्या सुपारी संशोधन केंद्र, मोठ्या प्रमाणात सुपारी उत्पादन असलेल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दोडामार्ग शिवसेने तर्फे माजी मुख्यमंत्री तथा खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्गचे मा.नारायणराव राणे यांना करण्यात आले आहे.
