You are currently viewing महाराष्ट्र शासना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार…

महाराष्ट्र शासना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार…

महाराष्ट्र शासना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार…

वेंगुर्ले

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा सत्कार भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रज्ञाताई परब हे गेली ३५ ते ४० वर्षे विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनस्तरावर तसेच विविध सामाजिक संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सामाजिक काम करत असताना महीलांना रोजगार उपलब्ध होऊन, महीला स्वताच्या पायावर उभ्या राहील्या पाहिजेत या उदात्त हेतुने महीला काथ्या कारखान्याची निर्मिती केली. प्रज्ञाताई परब ह्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या मानवतेच्या कामाचे अनुकरण करत कार्य करत असल्याने अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून भाजप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी बोलताना प्रज्ञाताई म्हणाल्या कि एक अद्वितीय राजकारण धुरंधर व कर्तृत्ववान राज्यकर्ता या नात्याने अहिल्यादेवींकडे पहाताना त्यांचे स्त्रीत्व हे त्यांच्या सामर्थ्यात भर घालताना दिसते . अत्यंत दुर्मिळ अशी संवेदनशील ,सर्वसामावेश, सर्वकश अशी दृष्टी त्यांच्या सर्व निर्णयात पहायला मिळते . नेतृत्व , कर्तुत्व , दातृत्व अन मातृत्व या चारही विषयात अहिल्यादेवी अलौकिक ठरल्या .अहिल्यादेवी ह्या एक शुद्ध मनाची , सात्विक विचारांची आदर्श राज्यकर्ती होती .

या सत्कार प्रसंगी या अभियानाचे जिल्हा संयोजक व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष पपु परब , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ , वृंदा गवंडळकर , वृंदा मोर्डेकर , रसिका मठकर , आकांक्षा परब , प्रणाली खानोलकर , समिधा कुडाळकर , हसीनाबेन मकानदार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा