You are currently viewing गहिवर

गहिवर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गहिवर*
********

स्मरता ओंजळ बकुळफुलांची
स्पंदने ही अजुनीही गलबलती

तो स्पर्श लाघवी व्याकुळलेला
नेत्री निष्पाप आसवे ओघळती

आसमंत बिलोरी तुझाच सारा
पापणीत रूपे तुझीच बिलगती

मनभावनांचे भावरंगले भावुक
गीतातुनी या काळजा स्पर्शती

पाहता क्षितिजा सांजाळताना
गतस्मृती अजुनही गहिवरती

स्मरण गंधली प्रीती चिरंजीवी
निर्मळी ओसंडिते भावाअमृती
************************( 43 )*
*©️वि.ग. सातपुते ( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा