*ॲबॅकसद्वारे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२५ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनीला प्राप्त घवघवीत यश :**
सावंतवाडी
अॅबॅकसद्वारे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२५ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची इयत्ता ४ थी तील विद्यार्थिनी कु. प्रार्थना प्रणय नाईक हिने घवघवीत यश प्राप्त केले. ही स्पर्धा सातारा, सांगली व कोल्हापूर येथील केंद्रावर आयोजित केली होती. या तिन्ही केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही गटातील अनेक विद्यार्थ्यांनी वरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी, प्राथमिक गटात ११ मे २०२५ रोजी कोल्हापूर येथील केंद्रावर कु. प्रार्थना प्रणय नाईक हिने वरील चित्रकला स्पर्धेत सहभाग दर्शवला व वरील तिन्ही केंद्राचा एकत्रित राज्यस्तरीय निकाल २७ मे २०२५ या दिवशी जाहीर करण्यात आला. सातारा येथे या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिने अभिनेता श्री. ग्षमीर महाजनी या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. कु. प्रार्थना प्रणय नाईक हिने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत बुद्धीची व कृतिशीलतेची चुणूक दाखवून दिली. हिला ट्रॉफी, प्रमाणपत्र व १०,००० रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच या विद्यार्थिनीला तिच्या पालकांचा व प्रशालेतील कला शिक्षिका सौ. सुषमा पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी तिचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

