रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड…
सावंतवाडी
भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे कामगार संघटना आणि राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.
गेली अनेक वर्षे कामगार हितासाठी कार्यरत असलेले आणि कामगारांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अनुभव आणि दूरदृष्टीचा फायदा निश्चितच अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे देशभरातील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल श्री. चव्हाण यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विविध राजकीय नेते, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
