You are currently viewing अतिवृष्टीमुळे त्रासलेल्या जनतेला खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येण्याची प्रतीक्षा- वैभव नाईक

अतिवृष्टीमुळे त्रासलेल्या जनतेला खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येण्याची प्रतीक्षा- वैभव नाईक

*अतिवृष्टीमुळे त्रासलेल्या जनतेला खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येण्याची प्रतीक्षा- वैभव नाईक*

सिंधुदुर्ग

गेले १५ दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आंबा बागायतदार यांचे नुकसान झाले आहे. कोकमचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सलग चार पाच दिवस अनेक तालुक्यात विजेअभावी अंधार होता. त्याचबरोबर नारायण राणेंचे चिरंजीव पालकमंत्री, आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाही, जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झाले आहे. येथील जनतेने नारायण राणेंना खासदार म्हणून निवडून दिले असून अतिवृष्टीमुळे त्रासलेली जनता खा. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाट बघत आहे. त्यामुळे मुंबईत उद्धवजी ठाकरेंवर टीका करण्याचा भाजपने दिलेला टास्क नारायण राणेंनी थोडे दिवस बाजूला ठेवून मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चालले आहे हे पाहण्यासाठी नारायण राणेंनी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा