You are currently viewing आनंदाचे झाड

आनंदाचे झाड

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आनंदाचे झाड*

 

 

दारी लावले मी आनंदाचे झाड

हळूहळू वाढू लागले ते फार

 

 

आनंदाच्या झाडाला रोज देते पाणी

तेव्हा सुचतात सुंदर गाणी

 

 

त्याला आली सुंदर फुलं

आनंदली लहान थोर

 

झाडाला आली गोड गोड फळं

जगण्यासाठी मिळाले बळ

 

झाडावर येतात पशू, पक्षी

निसर्ग माझा झाला सोबती

 

झाडावर येतात सुंदर पाखरं

सुखाने खाते मग भाकर

 

 

झाडाखाली येतात गुरं,वासरं

घरात माझ्या सुखाचा बहर

 

आपण ही लावा दारी आनंदाचे झाड

सावल्या मिळतील गार..गार

 

 

आनंदाच्या झाडाशी जमली आता गट्टी

घेत नाही आम्ही कधी कट्टी

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा