You are currently viewing साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे डॉ.बिभिषण सातपुते यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे डॉ.बिभिषण सातपुते यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पणजी, ता.

फोंडा येथील ज्येष्ठ साहित्यिक व ग्रंथपाल डॉ. बिभिषण सातपुते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या ३१ मे रोजी सायंकाळी ३.३० वाजता इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझाच्या मिनी सभागृहात हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक कृष्णाजी कुलकर्णी यांच्या हस्ते व दै. तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. धेपो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर व सचिव प्रकाश क्षीरसागर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ज्येष्ठ साहित्यिका शर्मिला प्रभू सुत्रसंचालन करतील.

बिभिषण सातपुते यांचा अल्पपरिचय

डॉ. बिभिषण सातपुते यांनी शिवाजी विद्यापीठातून बी. ए. आणि एम. ए. ची पदवी प्राप्त केली. कर्नाटकातील शिमोगा येथील कुबेंपु विद्यापीठातून एम. लिब. आणि शिवाजी विद्यापीठातून पीएच. डी पदवी प्राप्त केली. गोवा इंजिनिअरिंग महाविद्यालयातून सहाय्यक ग्रंथपाल म्हणून निवृत्त. नॅशनल इन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एन. आय. टी) या संस्थेचे ग्रंथपाल म्हणूनही काम पाहिले. गोवा इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या कँपस परिसराचे सुशोभिकरण करण्यामध्ये लँडस्केपिस्ट म्हणून योगदान, गोवा सरकारच्या सार्वजिनक वाचनालय धोरण ठरविण्याच्या समितीमध्ये सदस्य, गोवा इंजिनिअरिंग महाविद्यालय कर्मचारी पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक व संस्थापक सदस्य. इतर अनेक सामाजिक संस्थांवर प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा