You are currently viewing खाऊ घालतो वडापाव

खाऊ घालतो वडापाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खाऊ घालतो वडापाव*

(चाल: उघड दार देवा आता..)

 

पुरे करा देवा आता,

पुरे करा देवा !! (धृ.प.)

 

कुजून गेला कांदा आतां

नको तेवढ पाणी

भिजून गेली हळद

विचारी ना कोणी…………….1

झोपल्याही केळी आता

लागल्या *घोरायला*

मजूर मिळे ना कामाला

काय *गुन्हा* केला?…………2

कशास ठेवले जीवंत

नाही *पैका* गाठीला

दारी उभा *मारोती*

महाग झाला *शेंदूराला*……..3

डॉक्टर रहातो शहरात

मुडदे पडती *खेड्यात*

कां रे नाहीत ती *माणसे*

सर्व *पक्ष* दुर्लक्षितात……….4

हवे *दूध* गाईचे

जागा *नाही* शहरात

दूध *ढापून* वासराचे

चढ्या *दराने* विकतात…….5

करोनिया *थट्टा* देवा

मिळते *काय?* सांग

देवा *तुझ्या* दारी

असे श्रीमंताची *रांग*……….6

भाजीपाला हवा म्हणून

पळत सूटती *खेड्यात*

मोजुनिया दिडक्या जादा

अढी उपकाराची डोक्यात….7

नाही कां रे आंम्हा *पोट*

झोपतो घेऊन *चिरगुट*

नाही *नशीबी* रजई

बोचेल कां रे *ब्लॅन्केट?*..8

थाटमाट सगळे देवा

शहर वासीॅचे *उशाशी*

*दिसत नाही* पोट आमचे

झोपतो सदा *उपाशी*….9

अती झाले आतां देवा

विनवितो *एक* डाव

थांबव बरसणे *आता*

*खाऊ घालतो “वडापाव”*..10

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा