You are currently viewing चिपी विमानतळ कामगार भरती प्रकियेत स्थानिकांना प्राधान्य द्या….

चिपी विमानतळ कामगार भरती प्रकियेत स्थानिकांना प्राधान्य द्या….

आयआरबीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर यांची मागणी

मालवण :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपी विमानतळावर होणाऱ्या प्रत्येक वर्गातील कामगार भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर यांनी आय. आर. बी. कंपनीच्या मुंबईस्थित मुख्यलयामध्ये मुख्य अधिकारी देशमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत विमानतळ कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच विमानतळ भरती प्रकियेत स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावे. या लेखी निवेदनावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य अधिकाऱ्यांनी स्थानिक युवक युवतींना भरती प्रकियेला अनुकूलता दर्शविली. विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यातच ते लोकांच्या सेवेत येणार आहे. तरी या विमानतळ भरती प्रकियेत स्थानिकांना सामावून घेण्यासाठी प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत पाठपुरावा सुरूच राहणार असून जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना याठिकाणी प्रखर विरोध केला जाणार असल्याचे आशिष हडकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा