You are currently viewing ओझर विद्यामंदिर येथे उद्या मोफत करिअर मार्गदर्शन

ओझर विद्यामंदिर येथे उद्या मोफत करिअर मार्गदर्शन

ओझर विद्यामंदिर येथे उद्या मोफत करिअर मार्गदर्शन.

मालवण

मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती, संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव, मालवण या प्रशालेमध्ये दहावी, बारावीनंतर पुढे काय? दहावी बारावीनंतर मुलांनी कोणते क्षेत्र निवडावे? त्यांनी आपला कल व आवड ओळखून कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, या विषयावर मालवण येथील तज्ज्ञ मार्गदर्शिका सौ. नेहा करंदीकर – हुनारी यांची करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे मोफत आयोजन मंगळवार, २७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ओझर विद्या मंदिर कांदळगाव येथे करण्यात आले आहे. लाभ दहावी, बारावी उत्तीर्ण मुलांनी तसेच पालकांनी घ्यावा, असे आवाहन ओझर विद्यामंदिर परिवारातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा