*मांगवली येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू*
वैभववाडी
मांगवली येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत यशवंत भास्कर नाटेकर या गरीब शेतकऱ्याचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवानेच येथे मनुष्यहानी टळली. मांगवली मांडवकरवाडी येथील नाटेकर यांचा बैल चारणीसाठी सोडलेला होता. हा बैल जवळच असलेल्या ढवळवाडी येथील श्री. ढवळ यांच्या परड्यात गेला होता. ढवळ कुटुंब कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे घर बंद असतें, ढवळ यांच्या परड्यात विजेचा खांब असून हा खांब पूर्णतः वाकलेल्या स्थितीत आहे. याकडे वीज वितरण ने दुर्लक्ष केल्याने तो त्याच अवस्थेत आहे. शिवाय या खांबाच्या विद्युत तारांमधून वीज प्रवाह सुरु आहे. ज्यावेळी बैल या तारांच्या नजीक गेल्या त्यावेळी त्याला विद्युतभारीत तारांचा शॉक लागून बैल जागीच गतप्राण झाला.
