*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देव*
इथे तिथे देव आहे
देव नाही कोठे
देव आहे दगडात
डोंगरात भेटे
देव नांदे घरी दारी
शरीरात राहते
पाणी होऊन निर्मळ
नदीतून वाहे
देव लहानात आहे
मोठ्यातही आहे
देव मातीत उगवेल
नभातून पाहे
कणाकणात..नांदतो
श्वासात राहतो
मनामनात बिनतोड
रक्तात वाहतो
अनुपमा जाधव, डहाणू
