मान्सून पूर्व पावसाने त्रिंबक साटमवाडी बांबरवाडीला जोडणारा कॉजवे गेला वाहून…
मालवण
मान्सून पूर्व पावसाने आचरा परिसराला चांगलेच झोडपले आहे. त्रिंबक साटमवाडी-बांबरवाडीला जोडणा-या कॉजवेला यांचा फटका बसला असून कॉजवेचा काही भाग खचून पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे बांबरवाडीचा वाहतूकीचा संपर्क तुटला आहे.याबाबत तातडीने उपायोजना करण्याची मागणी माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांनी केली आहे.
त्रिंबक साटमवाडी-बांबरवाडीला या भागात वाहनाने जाण्यायेण्याचा हा एकमेव मार्ग होता. शुक्रवारी सकाळी ओढ्याला आलेल्या पूरामुळे बांबरवाडी भागाला जोडणा-या कॉजवे वाहून गेला. यामुळे याभागातील ग्रामस्थांना याचा फटका बसला आहे. याबाबत या ओढ्यावर त पिलर पूल उभारण्याची मागणी बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे ती तातडीने मार्गी लावण्याची मागणी याभागातील ग्रामस्थांकडून तसेच त्रिंबक माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांच्याकडून करण्यात आली आहे.
वीजेचा लपंडाव सुरुच मुसळधार पावसाचा फटका महावितरणला चांगलाच बसलाआहे.विद्यूत तारा तुटणे आदींमुळे वीजेचा खेळखंडोबा सुरुच आहे. सुरु असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे आचरा गावातील अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज समस्या निवारण्यासाठी विद्यूत कर्मचारी झटत असले तरी अजूनही विजेचा लपंडाव सुरुच आहे.
