सिंधुदुर्ग;
राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, माजी जिल्हाप्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते.

