You are currently viewing सहाय्यक महसुल अधिकारी दिलीप पाटील यांची नायब तहसिलदारपदी बढती

सहाय्यक महसुल अधिकारी दिलीप पाटील यांची नायब तहसिलदारपदी बढती

सहाय्यक महसुल अधिकारी दिलीप पाटील यांची नायब तहसिलदारपदी बढती

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुल विभागात सेवा बजावणा-या मंडल अधिका-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये कणकवली तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसुल अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले दिलीप पाटील यांना नायब तहसिलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांना वैभववाडी तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

दिलीप पाटील यांनी कणकवली महसुल विभागात गेली 30 वर्षे चांगली कामगिरी बजावली आहे. 2015 साली त्यांची आचरा मंडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2016 ते 2019 फोंडाघाट मंडल अधिकारी म्हणून काम पाहिले. 2017 ते 2023 सांगवे मंडल अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसुल अधिकारी म्हणून ते काम करत होते. शासनाच्या निर्देशानुसार दिलीप पाटील यांना नायब तहसिलदार पदोन्नती मिळाली आहे. तसेच दिलीप पाटील यांनी कोरोना महामारीत तत्कालीन तहसिलदार आर. जे. पवार यांच्यासमवेत चांगले काम केले होते. त्यानंतर तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासमवेत महायुती सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांमध्ये दिलीप पाटील यांचा पुढाकार होता. यापूर्वी त्यांना उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दिलीप पाटील यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल कौतुक होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा