You are currently viewing सलोनीचा सुट्टी प्लॅन

सलोनीचा सुट्टी प्लॅन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित सुट्टीतल्या गोष्टी -*

 

*सलोनीचा सुट्टी प्लॅन*

—————————————–

सलोनी आणि सुजीत हे बहीण-भाऊ, दोघात पाच वर्षांचे अंतर, बहीण मोठी आणि भाऊ लहान. खूप खेळकर आणि खोडकर स्वभाव असलेले हे दोघेजण भांडखोर मात्र अजिबात नाहीत.

धिंगाणा आणि मस्ती करणे हा तर सर्वच मुलांचा आवडता खेळ असतो. सोसायटीमधील सगळ्या मुलांशी

सलोनी आणि सुजितचे मस्त जमते.

 

याचे एक कारण होते , ते म्हणजे वादावादी न करणे,

खेळीमेळीने ,हसून खेळून रहाणे “या छान स्वभावामुळे

हे दोघे बहीण-भाऊ सर्वांचे बेस्ट फ्रेंड होते.

 

सलोनी आणि सुजितच्या आई-बाबांचा एक नियम होता

तो म्हणजे ” वेळेनुसार सगळ्या गोष्टी करायच्या”.

म्हणजे “शाळेच्या दिवसात अभ्यास, ट्युशनकलास,

यांना जास्त वेळ द्यायचा , आणि रविवार, सुट्टीचे दिवस”

या दिवशी एकदम मौज-मजा करायची.

आणि उन्हाळ्याची सुट्टी आली की अभ्यास, शाळा हे विषयच नाही, सुट्टी एन्जॉय करायची.

 

सलोनी आणि सुजीत दोघेही यानुसार वागतात.

शाळेच्या दिवसात फक्त संध्याकाळी खेळायचे”ईतर वेळी

मित्रांनी बोलावले तरी ते जात नाहीत. पण म्हणून काही

ते दोघे नाराज होत नाहीत.

कारण त्यांना माहिती आहे की, आपल्याला खेळण्यासाठी बंधने मुळीच नाहीत, पण कधी खेळायचे “याचे मात्र नियम आहेत.

 

सलोनीच्या सहवासात राहुन तिच्या काही फ्रेंड्सना ही सवय आवडली होती, काही जणांनी स्वतः असेच वागण्यास सुरुवात केली.

या फ्रेंड्सच्या आई-बाबांनी सलोनीच्या घरी येऊन तिच्या आई-बाबांजवळ कौतुक करीत म्हटले,

सलोनी थॅंक्यू ग !

तुझ्यामुळे आमची मुले, तुझे फ्रेंड छान वागत आहे!

 

वार्षिक परीक्षा संपली आणि सुट्टीचे दिवस सुरू झाले,

शाळेच्या दिवसात घरात रहाण्यास फार कमी वेळ मिळतो,

म्हणून सलोनीच्या मनात आले की,

आपण आईला सुट्टीत आराम करायला लावायचा, सुजितच्या मदतीने घरातली कामे करण्यास शिकायचे, मोठी मोठी काम आई नाही करू देणार हे मान्य,

मग छोटी छोटी आणि किरकोळ काम तर करूच शकतो की आपण.

 

मागच्या वर्षी आज्जी आली होती सुट्टीत, तेव्हा ती म्हणाली

सलोनी, बाहेर बाहेर रमण्यात फार आनंद नाही, त्याचा कंटाळा येतो, त्यापेक्षा,

आपण आपल्या घरात राहून आनंद मिळवावा,

घर स्वच्छ, नीट-नेटके ठेवणे यासाठी स्वतःच्या हाताने सगळी साफसफाई करून तर पहा, मग बघ

आपलेच सुंदर घर पाहून सगळे खुश तर होतीलच ,त्यापेक्षा आपले मन अगदी प्रसन्न आणि आनंदीत होते.

 

खाण्याचे आयते पदार्थ मागवून खाणेच बंद केले पाहिजे”,

असे न करता, हेच पदार्थ घरी बनवून पहावे, चुकत चुकत

आणि शिकत शिकत ” गोष्टी करण्यात फार मोठा आनंद असतो” ,हे घरात राहून कळू लागते.

 

या सुट्टीत आजी येऊ शकणार नव्हती, पण तिच्या सूचना तर लक्षात होत्याच की..

सलोनीच्या मनात विचार आला- या सुट्टीत बाहेरच्या कोणत्याही कॅम्पमध्ये, शिबिरात, छंद वर्गात जाण्याऐवजी

“आपल्याच घरातल्या शिबिरात आईकडून नव्या गोष्टी शिकून घेऊ या “!

 

सुजितला त्याच्या दिदीची आयडिया जाम आवडली”

आई-बाबांच्या समोर दोघांनी सुट्टीचा हा प्लॅन सांगितला,

आई-बाबांना अर्थातच खुप आनंद झाला.

बाबा तर म्हणाले- तुमच्या प्लॅन मध्ये मी जमेल तसा ऍक्टिव्ह रहाणार आहे रे मुलांनो.

 

आईने सलोनी ,सुजितला सुट्टीच्या छान प्लॅनबद्दल शाबासकी दिली.

—————————————-

लेखक- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा