पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने कुडाळ शहरातील पाणीपुरवठा बंद
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी टँकरच्या माध्यमातून केला स्वखर्चाने पाणीपुरवठा
कुडाळ
कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम सुरू असून मुसळधार पावसामुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत. कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी शहराला होणारी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. तसेच ज्यांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे अशांनी आपल्याशी 9423026646 या क्रमांकावर संपर्क साधावा त्या भागामध्ये टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, रोहित भोगटे, आबा धडाम, राकेश कांदे, शिवम म्हाडेश्वर, मयूर कुडतरकर, तन्मय सावंत, रोहित सावंत, सागर वालावलकर आदी उपस्थित होते.
———————————————-
🤱🏻 *जान्हवी बेबी केअर, दोडामार्ग*
🤱🏻 *लहान बाळांसाठी सर्व साहित्य मिळणारे एकमेव दुकान*
———————————————-
🎁 जन्मलेल्या बाळांसाठी उशी, लड, मच्छरदाणी, टोपरे, लंगोटी, मँट, *पाळणा* कपडे, बेबी किडस् , शाँल, टाँवेल, *खेळणी* : मुठ, थिथर, सर्व बाँटल, खुळखुळा 🚲 *सायकल* 👉 १२, १४, १६, २०, २४, २६ इंच उपलब्ध // *कार* : 🚘 चार्जिंग बॅटरी कार 🚔, *बाईक* : 🏍️ चार्जिंग बॅटरी बाईक 🛵, *वाँकर* 👉 म्युझिक / अँडजेस्टमेन्ट उपलब्ध 🛴, मँट, 🍼 बाँटल, टिटर, 🧸 ट्रेडी, *झोपाळा* 👉 कुशन / प्लॅस्टिक उपलब्ध, शाँल, *पाळणा* 👉 ट्रोली पाळणा / बाँक्स पँकिग पाळणा उपलब्ध . मच्छरदानी, गादीसेट, बेबी गिफ्ट्स, पांड्या, लिंजा, कार 🚗, बेबी टाँवेल, सुंगधिक फरफ्युम, विविध गिफ्ट, सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध.
🛣️ पत्ता : *जान्हवी बेबी केअर, दोडामार्ग, श्रीराम सुपर मार्केटच्या शेजारी 📲 / प्रोप्रा. पत्रकार भूषण सुधाकर सावंत 🪀9309978684*
———————————————-
🏦 ✍🏼 *सिंधदुर्ग न्युज कार्यालय* ✍🏼 बाजारपेठ-दोडामार्ग, तिराळी रोड. *बातम्या व जाहिरातीसाठी 🪀9309978684 संपर्क साधा*
———————————————-

