You are currently viewing पाऊस

पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस*

 

घनं अंधारून आले

सरसर धारा बरसल्या

रख रखं सृष्टीवरती

दिल खुलास कोसळल्या

 

खट्याळ वारा आला

गाली सृष्टीच्या टीचकला

जल प्राशन करुनी नभीचे

वसुंधरेने हाय केला

 

मरगळलेल्या तरु वेली

तृप्त होवुनी न्हाहल्या

झाडावरती खोप्या मध्ये

चिऊताई विसावल्या

 

गडगडती ढग सारे

सौदामिनी कडाडती

नृत्य चाले बिजलीचे

ढोल ढगांचे वाजती

 

धारांच्या संगे चाले

नृत्य रानी मयुराचे

संगे मैना रानी नाचे

दृष्य पाहु रानाचे

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा