जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा रुग्णाल सिंधुदुर्ग एनपीएनसीडी विभागामार्फत जागतिक उच्चरक्तदाब दिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क वर्ग-1) डॉ. सुबोध इंगळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रोहन सांळुखे,एनसीडी विभागातील अधिकारी व कर्मचारी केतन कदम, संतोष खानविलकर, कार्मिस अल्मेडा, रमेश पंडित तसेच एनसीडी स्टाफ नर्स व लाभार्थी उपस्थित होते.
श्री. श्रीपाद पाटील यांनी एनसीडी कार्यक्रमांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवाबाबत माहिती दिली. तसेच श्रीम.तृप्ती जाधव यांनी जागतिक उच्चरक्तदाब दिनाच्या अनुषंगाने उच्चरक्तदाब आजाराविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक हर्षदा मुननकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्मिस अल्मेडा यांनी केले.

