*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भाषा माझी मौनाची*
*******************
स्वान्त सुखाय सदासर्वदा
भाषा माझीच मौनाची
व्यर्थ बोल उगा कशाला
नको मुक्त उधळण शब्दांची…..
मन्मनांतर संयमी असावे
राखावी अंतरे सर्वांची
कटू बोल ते जीव्हारी
विसंगती असे वैखरीची…..
शब्दशब्द सत्य वदावे
जाण असावी वास्तवाची
शब्दांचे तर शस्त्र विखारी
साक्ष विकलांग भावनांची…..
मितभाषेचा संग सुलक्षणी
अनुभूती स्वानंदी मौनाची
सात्त्विक जन्म हाच मानवी
कृपा केवळ त्या ईश्वराची…..
***********************
*( 42 )*
*©️ वि. ग. सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 9766544908)*
