*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहा एके चहा…*
चहा एके चहा अहो पिऊन तरी पहा
नका पिऊ दिवसातून चहा पण, दहा..
चहा म्हणजे ब्रेक, फास्ट..खाणे टाळण्यास
भूक भूक होत नाही, पोट मागत नाही घास..
उठसूठ चहा प्रकृतीला हानिकारक
शुगर वाढते आणि होतो आरोग्याला मारक..
कोणतीही गोष्ट नेहमी असावीच माफक
नाहीतर परिणाम मिळतात फारच दाहक..
चहा सुद्धा तीन वेळा वाटते खूप झाला
हळू हळू चवीने तो संपवावा पेला…
साखर किंवा गूळ त्यात नावालाच टाका
पुदिना वेलची लवंग टाकून घेऊन पहा वासा..
राज्याराज्यात आहेत पहा चहाचे प्रकार
काश्मिरमध्ये मिळतो कावा, कपाचे किती आकार..
कानाचे, बिनकानाचे,डिस्पोजल, कुल्हड
चार मित्र जमताच पहा उडते कशी हुल्लड..
फुल हाफ कटिंग ग्रीन कितीतरी गमती
सहज पाजतो दुसऱ्याला फार नसतो किमती..
घरीदारी सर्वत्र चहाला आहे मान
चहा पिऊन काही शौकीन खातात पहा पान..
अति सर्वत्र वर्ज्यते हा मंत्र ध्यानी धरा
कोणी घरी आल्यावरती हाफ कपच भरा..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
