You are currently viewing पाऊस

पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस*

 

धडाड धूम आभाळ वाजले, धुळीचे उठले उंच मजले

सो सो सो सो सुटला वारा,पडू लागल्या अंगणी गारा

घरात गेली साऱ्यांना वर्दी, वेचायला मुलांनी केली गर्दी

लख लख,लख लख विज चमकली,मनात खूप धडकी भरली

धुळीच्या केव्हढ्या उठल्या झुंडी, मनीमाऊची घाबरगुंडी

घर घर घर घर नभात वाजते, ढगा मध्ये कोण दळते?

सुरु झाल्या टप टप सरी, कुणीच नव्हते तेव्हा घरी

हळूच उघडले दार जरी, मनात भीती वाटली तरी

वाकली होती दारची केळ, निघून गेली शाळेची वेळ

आईला म्हटलं खूप पाउस, आई म्हणाली नकोस जाउस

पावसाने खूप दाणादाण केली, मला मात्र मज्जा आली.

 

श्रीनिवास गडकरी

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा