You are currently viewing घर

घर

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*घर*

 

माझ्या घराच्या समोर

आहे समुद्राची खाडी

माझे घरकुल असे

जशी पाण्यातून होडी

 

 

माझ्या घराच्या मागेच

सागर तो पसरला

माझी कराया सोबत

जणू ईश्वर ठाकला

 

 

घरापासून जवळ

एक तलावही आहे

त्यात फुलती काळे

मनी निर्मळता वाहे

 

 

माझ्या घराला लागून

वाडी फळांची फुलांची

तशी साथ जीवालाही

जीवलगाची,मुलांची

 

 

अनुपमा जाधव (कवयित्री)

प्रतिक्रिया व्यक्त करा