बौद्धिक प्रगती मंडळ ओसरगाव आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव 2025 निमित्त सन्मान कर्तृत्वाचा*
*बबली राणे यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन केला सत्कार*
*कणकवली*
ओसरगाव बौद्धवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने 14 तारीख ला गावातील दहा विविध क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटविणाऱ्यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गावातील 10 विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. बबली राणे यांना 25 वर्ष अपघात प्रसंगी डेड बॉडी उचलणे जखमींना हॉस्पिटलला घेहुण जाणे या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवर ॲड. विलास परब, डॉ. आबा मोहिते, सौ सुचिता मोहिते, पोलीस पाटील सौ संजना आंगणे दशावतार कलावंत श्रीविजय परब आदर्श शिक्षक शैलेश तांबे सदानंद मोरे आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका सौ सोनल मोरे आलव मॅडम सुनील राणे इत्यादी व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मुंबई व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
