गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
कणकवली
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखा कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन सेवा संघ कणकवली जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज बुधवार दि. २१ मे २०२५ रोजी कणकवली येथे संपन्न झाला. यावेळी 2025 मधील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा पेन्शनर असोसिएशन सिंधुदुर्ग चे कार्याध्यक्ष सन्माननीय शरद कांबळी सरचिटणीस सन्माननीय उदय कुडाळकर सन्माननीय ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कुडाळ तालुकाध्यक्ष सुरेश कोरगांवकर ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवली चे अध्यक्षा सौ श्रद्धा कदम सचिव श्रीमती पूजा सावंत संघ, जिल्हा संघटक श्रीमती रिमा भोसले तालुका सहसचिव श्री.विनायक पाताडे कोषाध्यक्ष सुभाष राणे जिल्हा उपाध्यक्ष व पेन्शनर असोसिएशन कणकवली तालुका अध्यक्ष श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर सचिव श्री विलास चव्हाण जिल्हा सचिव श्री सपकाळ ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली तालुका अध्यक्ष श्री मनोहर पालयेकर श्री.राजस रेगे उपस्थित होते प्रास्ताविक श्रद्धा कदम आभार दादा कुडतरकर सुत्र संचालन रिमा भोसले यांनी केले.
तसेच या कार्यक्रमाला ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवली च्या उपाध्यक्षा श्रीमती गितांजली कामत सदस्य श्री. प्रकाश वाळके सदस्या श्रीमती रश्मी माणगांवकर उपस्थित होते. सर्वश्री श्री भोजे, श्री वंजारी,श्री पाटकर श्री दळवी,श्री सिद्धार्थ तांबे तसेच पेन्शनर असो, ग्राहक पंचायत,जेष्ठ नागरिक संस्था,विदयार्थी,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
खालील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
➡️ एस.एस.सी परीक्षा :
मार्च २०२५
➡️ कणकवली तालुका निकाल
◆ कुमारी-विधी विरेंद्र चिंदरकर
(विद्यामंदिर कणकवली)
टक्केवारी – ९९.४०
*प्रथम क्रमांक*
◆ कुमार-ध्रुव आंनद तेंडुलकर
(विद्यामंदिर कणकवली)
टक्केवारी – ९९.४०
*प्रथम क्रमांक*
◆ कुमारी-नक्षत्रा राजेंद्र काळे
(सेंट उर्सुला स्कुल ,वरवडे)
टक्केवारी – ९९.२०
*द्वितीय क्रमांक*
◆ कुमार-अथर्व परशुराम कोचरेकर
(विद्यामंदिर कणकवली)
टक्केवारी – ९८.६०
*तृतीय क्रमांक*
_________________________
➡️ एच.एस.सी परीक्षा :
फेब्रुवारी २०२५
➡️ कणकवली तालुका निकाल
*कला शाखेत प्रथम*
◆ कुमारी- श्रेया महेश तावडे
( कासार्डे ज्यु.कॉलेज)
टक्केवारी- ८७.५०
*वाणिज्य शाखेत प्रथम*
◆ कुमार-तन्मय संजय सावंत
(कणकवली कॉलेज)
टक्केवारी – ९४.३३
*विज्ञान शाखेत प्रथम*
◆ कुमारी- श्रावणी राजेंद्र मराठे
( आयडियल इंग्लिश स्कुल)
टक्केवारी- ८७.६७
*व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत प्रथम*
◆ कुमारी- नम्रता अरुण तेजम
( कणकवली कॉलेज)
टक्केवारी- ८१.६७
______________________________
*संवाद मीडिया*
👩🎓👨🎓👩🎓👨🎓👩🎓👨🎓👩🎓👨🎓
*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*
सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*
_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_
_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._
_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_
_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_
_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._
_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*
*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*
_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_
*अधिक माहितीसाठी*👇
*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*
*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/166251/
https://www.facebook.com/share/p/1FMLVgkauT/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.
