पहाटे तिलारी-दोडामार्ग मुख्य राज्यमार्गावर पिकअप गाडीचा अपघात…
चालक बचावला, मात्र टेम्पोचे मोठे नुकसान…
दोडामार्ग
चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिलारी दोडामार्ग मुख्य राज्यमार्गावरील आंबोली-केळीचे टेंब येथे एका बोलेरो पिकअप टेम्पोचा अपघात झाला. ही घटना आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात चालक बचावला. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो पिकअप टेम्पो चा अपघात झाला. हा टेम्पो दोडामार्ग मार्गे गोव्याच्या दिशेने जात होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, ती नंतर सुरळीत करण्यात आली.

