You are currently viewing आर.जे. पवार यांचेकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

आर.जे. पवार यांचेकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

सिंधुदुर्ग :

देवगड तहसिलदार आर.जे. पवार यांना जिल्हा खनिकर्म अधिकारी सिंधुदुर्ग या पदाकरीता आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. पवार यांनी आपल्या मुळ पदाचा कार्यभार सांभाळून वरील पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणेचा आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहेत. श्रीम. चैताली सांवत या तहसिलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचेकडे हा जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा