अरुणा मध्यम प्रकल्पासाठी सुधारित २०२५ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी..
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; ५३१० हेक्टर सिंचन क्षमतेची निर्मिती होणार…
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील बहुप्रतिक्षित अरुणा मध्यम प्रकल्पासाठी २ हजार २५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे हा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार असून त्यामुळे ५ हजार ३१० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाकडून माहिती देण्यात आली. अरुणा मध्यम प्रकल्पामुळे परिसरातील शेतीला मोठा फायदा होणार असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे. या सुधारित खर्चाच्या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून लवकरच तो पूर्णत्वास जाईल, अशी शक्यता आहे.
