You are currently viewing आयुष्य विंचरून झालं..!!

आयुष्य विंचरून झालं..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 

*आयुष्य विंचरून झालं..!!*

 

वेडापिसा मुका जीव

काही धड नाही

सारी धडधड पडझड

फुंकायला प्राणवायू नाही..!

 

नको असा नरजन्म

त्याहून वानर परवडला

आरश्यात बघून झालं

माकडचेष्टेत जन्म गेला…!

 

परकं पोरकं एकटं

जगता येत नाही

वास्तव भुंकायला लागलं

आकांताएवढं क्रौर्य नाही..!

 

आयुष्य विंचरून झालं

केसही उरले नाही.!भांगही पडत नाही

ऋणानुबंधाचं प्रिय आयुष्य

नावालाही शिल्लक नाही..

 

सरणावर ठेवणारा म्हणेल

असा चटका देतो

जातांना उठून बसशील

आयुष्याला क्षुल्लक समजतो..!

 

निष्ठा असतील वेगळ्या

आयुष्य प्रामाणिक असत

हातावर बडीशेप ठेवून …निरोपाची

चवीनं विरघळून जातं..!

आयुष्य चवीनं विरघळून जातं…!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा