*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
________________________
श्री स्वामी समर्थ काव्यवंदना -काव्यपुष्प-२३ वे
__________________________
स्वामींची भ्रमंती । अखंड ते चालती । राहुनी हिमालय पर्वती। स्वामी आले जगन्नाथपुरीला ।।१ ।।
या स्थानी स्वामींचे रहाणे ।जगन्नाथस्वामी नावाने ।
इथे झाले भेटणे । अलवणी बुवा या सत्पुरुषाशी ।।२ ।।
या बुवांच्या सोबत । अन्य तिघेजण असत । होती तिघेजण
ज्वराने ग्रस्त । मदतीस कुणी येईना ।। ३ ।।
जगन्नाथ स्वामींची भेट होता । अलवणीबुवा जोडी दोन्ही हाता । म्हणे, स्वामी तुम्हीच आमचे त्राता । करावे रक्षण आमचे ।। ४ ।।
चौघांचे रक्षण केले । त्यांना व्याधीमुक्त केले । सुग्रास भोजन दिले । तृप्त त्यांना केले दयाघन स्वामींनी ।। ५ ।।
पुढच्या काळात । अलवणीबुवां आले अक्कलकोटात ।ज्यांना पाहिले जगन्नाथपुरीत । तेच भेटले अक्कलकोटात । स्वामी समर्थ अलवणीबुवांना ।। ६ ।।
**********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.
___________________________
