You are currently viewing ओरोस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विविध व्यवसायांकरीता प्रवेश अर्ज सुरु

ओरोस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विविध व्यवसायांकरीता प्रवेश अर्ज सुरु

ओरोस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विविध व्यवसायांकरीता प्रवेश अर्ज सुरु

सिंधुदुर्गनगरी 

ओरोसयेथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट-2025 करिता मंजूर असलेल्या १) Dress Making, २) Front Office Assistant, ३) Food Production General, ४) Mechanic Diesel, ५)) Welder, ६) Electrician ६) Mechanic Motor Vehicle, ७) Fitter, ८) ICTSM, ९) Electronic Mechanic, १०) Electronics Mechanic ৭৭) Draughtsman Mechanic या व्यवसायांकरीता https://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली, असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.एस.मोहारे यांनी दिली आहे.

या प्रवेशास इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व अर्जाचे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत पडताळणीकरीता मूळ कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्सप्रतींसह दिनांक 16 मे  पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेऊन कार्यालयीन वेळेत हजर रहावे. उमेदवारांचे अर्ज तपासणी करुन अर्ज निश्चित (Confirm) केला जाईल व पावती दिली जाईल. अर्ज निश्चिती (Confirm) नंतर उमेदवारांने प्रवेशासाठी आपल्या पसंतीनुसार ट्रेड विकल्प (Trade Option) दिनांक 26 मे  पासून भरावेत. इ.10 वी ची गुणपत्रिका (Marksheet) शाळांमार्फत वितरीत करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक घोषित केले जाईल.

प्रवेशोच्छुक उमेदवारांनी अधिकच्या माहितीकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस, मु. सिंधुदुर्गनगरी-ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्र. (०२३६२) २९५८०८ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२५९६०३४/९४२०९१०९१२ वर संपर्क साधावा, असे आवाहन ओरोसचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा