कणकवली:
कणकवलीतील परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थानाच्या कायमस्वरूपी मंडपाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. पालकमंत्री सामंत यांनी भालचंद्र महाराज संस्थानाला या मंडपाचे काम करण्याचे वचन दिले होते. त्याची वचनपूर्ती आज थाटामाटात करण्यात आली. या भूमिपूजन प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर , संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, शिवसेना गटनेते सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, मुरलीधर नाईक, संजय आंग्रे, सचिन सावंत, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, ॲड. हर्षद गावडे, राजू राठोड, सुनील पारकर, रामदास विखाळे, उमेश वाळके, तेजस राणे, संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी गेली काही वर्ष हे काम करण्याची इच्छा होती. ते आता मार्गी लागत असल्याबद्दल समाधान असल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी दिली.