शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांची झरेबांबर येथील स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराज स्मारकाला भेट
दोडामार्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात शहरात कार्यक्रम असल्याने या कार्यक्रम ठिकाणी जाण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात दाखल झालेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अध्यक्ष श्री संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी नव्याने झरेबांबर येथे उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला भेट दिली. आणि अभिवादन केले. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील हिंदू शिवशंभू प्रतिष्ठान दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोडामार्ग पोलीस घटनास्थळी बंदोबस्त घेऊन उपस्थित होते.

