*राष्ट्रकवी संजय निकम:रवींद्रनाथ पुरस्काराने सन्मानित*
*मालेगाव (बबनराव वि.आराख)*
येथील सुप्रसिध्द राष्ट्रीय कवी लेखक आणि समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांच्या साहित्य संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल, आग्रा येथे बूजलोक साहित्य कला संस्कृती अकादमी फतेहाबाद,आग्रा या संस्थेतर्फे नुकतेच , रवींद्रनाथ टागोर सन्मान देऊन गौरविण्यात आले., संस्थेचे अध्यक्ष मुकेश कुमार वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय कवी लेखक आणि समीक्षक संजय मुकूंदराव निकम मालेगाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास अभिषेक कुमार, सुनील पांडे,अशोक पटनी, अर्चना श्रेया, डॉ जसप्रीत कौर फलक,रश्मि अरोड़ाआदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.तसेच आग्रा येथील सर्व स्तरातील नागरिक आणि रसिक श्रोते कार्यक्रमास उपस्थित होते.जसप्रीत कौर फलक यानी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. रश्मी अरोड़ा यांनी उपस्थितांचे आभार मानले.हा कार्यक्रम आग्रा येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

