You are currently viewing झी सिने अवॉर्ड्स २०२६ सिंधुदुर्गात..! 

झी सिने अवॉर्ड्स २०२६ सिंधुदुर्गात..!

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) – सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून नुकतीच ही अधिकृत घोषणा करण्यात आली.

या ऐतिहासिक निर्णयामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन क्षेत्र आणखी वेगाने विकसित होण्यास चालना मिळणार आहे. या घोषणेदरम्यान स्क्रीनवर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच सिंधुदुर्गातील अनेक सुंदर पर्यटन स्थळांचे दर्शन घडवण्यात आले. उपस्थितांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

२३ व्या झी सिने अवॉर्ड्स कार्यक्रमालाही नामदार नितेश राणे उपस्थित होते, तेव्हापासूनच त्यांनी सिंधुदुर्गात हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

ही बातमी समजताच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पसरले असून, ‘हा कार्यक्रम नेमका कोठे व कधी होणार?’ याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

स्थानिक नागरिक व पर्यटन व्यवसायिकांच्या मते, सिंधुदुर्गात झी सिने अवॉर्ड्ससारखा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम आयोजित करून पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी पर्यटनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा