You are currently viewing दोन शब्द

दोन शब्द

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दोन शब्द*

 

दोन शब्दांचं महत्व

आहे फार जीवनात

मनात वाटायला हवे

उच्चार यावा मुखात…

 

दोन शब्द बोलून

कौतुकाची थाप पडते

उत्साह‌ वाढतो तसाच

कलेस प्रेरणा मिळते…

 

‌दोन शब्द आपुलकीचे

‌‌ धीर येतो जीवाला

आहे आपले कोणीतरी

हात देऊन सावरायला…

 

दोन शब्द वात्सल्याचे

प्रेरणा स्फुरण जीवनात

अशक्य ते शक्य होते

ताकद असते शब्दात…

 

दोन शब्द जपून बोला

लागतात कधी जिव्हारी

शस्रापेक्षा वार करतात

शब्द असतात दुधारी….

 

‌‌ दोन शब्द कानी सांगता

‌‌ वर्ण युवतीचा आरक्त

गुपीत सांगता मनातले

भाव चेह-यावर व्यक्त….

 

‌‌ दोन शब्द संवाद

आईबापाशी जरूर करा

समाधान बघा त्यांचे

ताण तणावाला विसरा..

 

दोन शब्द मधुर बोलता

येतील सारे जवळ

अहंकाराला नको थारा

मन असावं नितळ….

 

दोन शब्द निसर्गाशी

‌‌. साधून बघा संवाद

मनाला आनंद देणारे

जागवती अंतर्नाद..

 

‌‌. दोन शब्द मनातच

गूज ईश्वराशी करावे

उपकार मानून दात्याचे

अंतरी तादात्म्य साधावे …

 

🍁🍃🍃🍁🍁🍃🍃🍁

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा