डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी मूल्यांवर आधारीत संविधानाची निर्मीती केली -रमाकांत जाधव
उगाडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी! ; रमाकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती
दोडामार्ग प्रतिनिधी:
समता,स्वातंत्र्य ,बंधुभाव आणि न्याय या मानवी मूल्यांवर आधारीत भारताच्या संविधानाची निर्मीती करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक गुलामगिरीतून समाजाला मुक्त करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले,याची प्रत्येकाने जाणीव ठेवून त्यांच्या विचारांने वाटचाल करण्याची आज बहुजन समाजाला खरी गरज आहे असे प्रतिपादन आर. पी. आय. (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव – रमाकांत जाधव यांनी केले.उगाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी आयु.रमाकांत जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून बुद्ध वंदना,त्रिसरण ,पंचशिलाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून आर. पी. आय. (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, प्रमुख वक्ते पत्रकार शंकर जाधव,संदीप जाधव,आर.पी.आय.(आठवले) जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे, आर.पी.आय.(आठवले) महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग च्या नगरसेविका – आयुनी.ज्योती रमाकांत जाधव, सरपंच सुजल गवस,पोलीस पाटील अनुष्का गुरव,सुभाश कांबळे योगेश राणे,भैया (अंकुश) नाईक,प्रवीण गवस, राकेश ताटे, दीपक कुडासकर, सूर्यकांत गवस, आर.पी.आय (आठवले) तालुका उपाध्यक्ष मनोहर जाधव सह आदी उपस्थित होते.
श्री.जाधव पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने, प्रज्ञा सूर्याने शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक गुलामगिरीतून समाजाला मुक्त करण्याचे महान कार्य केले आहे. याची प्रत्येकाने जाणीव ठेवून त्यांच्या विचारांने वाटचाल करण्याची गरज आहे, संविधानिक मुल्ये जपण्याची गरज आहे,असे विचार आर. पी. आय. (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव – रमाकांत जाधव यांनी मांडले.
प्रसार माध्यमांचे महत्व जाणून बाबासाहेबांनी वृत्तपत्रे सुरू केली आणि ती यशस्वीरित्या चालवली,हा त्यांच्या पत्रकारितेचा वैचारीक वारसा चालवण्याची गरज असल्याचे मत पत्रकार शंकर जाधव यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.यावेळी संदीप जाधव,आर.पी.आय.(आठवले) जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे, आर.पी.आय.(आठवले) महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग च्या नगरसेविका – आयुनी.ज्योती रमाकांत जाधव,कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम जाधव,सरपंच सुजल गवस,पोलीस पाटील अनुष्का गुरव,सुभाश कांबळे योगेश राणे, भैया (अंकुश) नाईक, प्रवीण गवस यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमदत्त जाधव यांनी तर आभार किशोर जाधव यांनी मानले.
