You are currently viewing प्रीतीसंगम …

प्रीतीसंगम …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रीतीसंगम ….*

 

रंग कुसुंबी तुझ्या मिठीने जीवनात आणिला

कुंतल काळे गंध, रेशमी, गजरा मी माळिला…

 

सायंकाळी क्षितिजावरती चंद्र खुणावे मला

नयन बावरे बघ ना माझे नित्य शोधिती तुला…

 

नक्षत्रांची ती रांगोळी मनमोहक रे किती

बोल बोल ना मधुर तू बोलून दाखवी प्रीती..

 

अधरावरच्या रसरंगाने रसरसलेली काया

सांग किती तू सांग ना मजला किती तू करतो

माया..

 

प्रीतीच्या या झुल्यावरती ढग पालख्या होऊ

मधुरा तुझी मी तुला शोभते तू माझा ना राऊ…

 

जगरहाटी विसरून सारी बघ ना बघ विभ्रम

चैत्र फुलावा वैशाखातच शीतल तू चंद्रम…

 

क्षितीज कडेला जाऊ आपण रात्र चांदणी होऊ

चांद्ररसातच बघ त्या रूपेरी नक्षत्रे होऊनी राहू..

 

प्रीत आगळी तुझी नि माझी स्मरता प्रेम रसाला

असा अनोखा प्रीतीसंगम बघ ना आपुला झाला…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा