You are currently viewing पहाट

पहाट

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पहाट*

 

विद्यार्थ्यांनो

निराश होऊ नका

नैराश्याने खचून जाऊ नका

जीवनापासून पळू नका

आत्महत्या करु नका

 

 

अपयश हे

अपयश नसतंच मुळी

तो एक अनुभव असतो

जशी ठेच नसतेच ठेच

तो एक अनुभव असतो

जीवनात अनुभव घ्यायचे असतात

अनुभवांनीच जीवन

घडत असतं

 

 

थंडी , ऊन,वारा

वादळ, पाऊस,अंधार

यांना कधीच भ्यायचं नाही

त्यातून पार व्हावं

चालत जावं

अंधार सरणारच असतो

पहाट होणारच असते

 

 

 

अनुपमा जाधव(शिक्षिका)

शाळा..के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा